बिरुदावल्यांची जलपर्णी आणि वास्तव भारतासारख्या देशात आणि मुख्यत्वेकरून महाराष्ट्रात नद्या – नाले, तलावांवर माजणारी जलपर्णी नवीन नाही. तशी पाहायला गेलं तर एक वनस्पती, लांबून बघताना हिरवीगार दिसते अगदी एखादी एखाद्या दुलईसारखी. लहानपणी मला वाटायचं, आणि माझी खात्री आहे तुमच्यापैकी काही जणांना देखील कधी ना कधी, ‘जलपर्णी ही एक वनस्पती आहे, भरपूर प्रमाणात दिसत आहे आणि […]
तमसो मां ज्योतिर्गमय
प्रकाशाची भीती फक्त असुराला असते. कारण अंधार हे असुराचं साम्राज्य आहे. पण इतक्या मोठ्या साम्राज्याचं अधिपत्य असूनही असुराच्या मनात एक भीती असते, की त्याचे अंधाराचे साम्राज्य एखाद्या दिव्याने उजळण्यापर्यंतच आहे. एका किरणात देखील त्याचे अंधाराचे साम्राज्य नष्ट क्षमता असते. असुर या किरणांच्या भीतीने ग्रासलेला असतो. त्यामुळे हा असुर सतत या दिव्याशी युद्ध करत असतो, दिव्याला […]
संभ्रम आणि व्याख्या
त्याला परीघ बनवायची हौस, तिला रेष मारण्याची खोड. शेवटी मी त्यांच्यासाठी अनुभवांचे टिंब काढून दिले आणि म्हणालो आता खेळा! असतात अशा काही प्रश्नकाहूर केविलवाण्या वेळा. त्याने पहिले पाऊल उचलले. पण पाऊल पडण्याआधी तिने सरळ काही टिंबांना छेद दिला. तो स्तिमित झाला पण खचून न जाता काही परीघ बनवू लागला. बघता बघता त्यांच्यात स्पर्धा सुरु झाली. […]
व्यक्तिपूजा आणि भारतीय समाज
कुणाला काय आवडेल? आणि कुणाला कशाचा तिटकारा वाटेल? सांगता येत नाही. कधी कधी तत्त्वांच्या आहारी (!) गेल्याने परिप्रेक्ष्य धूसर होऊन जातो. तसंच काहीसं मनाला वाटून गेलं जेव्हा काही मंडळींनी नरेंद्र मोदींच्या पुतळ्याला श्रद्धेने नमस्कार केला आणि काहींनी (जवळजवळ सगळ्यांनी) मनापासून या गोष्टीचा तिरस्कार केला.
भारतीयांना रांगेची ॲलर्जी का आहे?
नाटक – सिनेमा बघायला गेल्यावर ज्या एका गोष्टीचा मला मनापासून उबग येतो ती गोष्ट म्हणजे सामोसा – वडा विकणाऱ्याच्या समोरील माणसांच्या थप्पीतून वाट काढत काहीतरी विकत घेणे. मला ते दृष्य एखाद्या युद्धासारखे वाटते. पण हा अनुभव फक्त सिनेमाघरात किंवा नाट्यगृहापर्यंत मर्यादित नाही. मला कधी PMT बसमध्ये, मुंबईच्या लोकलमध्ये घुसता आलं नाही, बँकेत मी काऊंटर समोर […]
प्रवाह, परिस्थिती आणि नियती.. एक चिंतन
प्रवाहच थांबतो तिथे, जिथे तू उभी असतेस… प्रत्येक वळणावर भेटतेस, कधी साथ देतेस कधी उगाच हात सोडून हरवतेस.वाट असते पण मार्ग दिसत नाही. नशीब म्हणत म्हणत पुढे जाताना पुन्हा प्रत्येक मार्गावर तू दिसतेस…. मी थांबतेच पण पुन्हा पुन्हा तूला प्रश्न विचारावसा वाटतो, साथ देणार की हात सोडणार…?? सहज उत्तरतेस तू पुढे तर चाल, मी आहेच […]
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस आणि आपली जबाबदारी
लोकशाहीमध्ये फक्त लोकच सत्तेत आणू शकतात आणि तेच सत्तेतून बाहेर काढू शकतात. एवढी शक्ती जर लोकांच्या हातात असेल तर जबाबदारी देखील तेवढ्याच प्रमाणात वाढते.
(दुसऱ्याच्या) अंगणातील फुले, मंदिर आणि प्रार्थना
सकाळी सकाळी फिरण्याचे शारीरिक आरोग्याला फायदे होतात (होऊदे बापुडे!) पण मी फिरतो ते मानसिक आणि वैचारिक आरोग्य चांगले राहावे म्हणून. काही छोट्या घटना पाहून एक विचार मनात येतो. मग तो विचार स्वतःबरोबर अनेक विचारांना ‘मागुते या’ करत घेऊन येतो. चकरा मारता मारता या उप-विचारांचा एक विचित्र गुंता बनतो आणि मग एक खेळ सुरू होतो. खेळ, या गुंत्यातून तर्काच्या धाग्याला अलगदपणे बाहेर काढण्याचा! असंच काहीसं घडलं आज […]
पुरुषदिन – एक जागतिक उदासदिन
तर आज जागतिक पुरुषदिन! काहीही लिहायच्या आधी हे सांगणं आलंच की मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीयेत. कारण स्वतः उदास झालेला माणूस कोणाच्या भावना कसा दुखवू शकतो !? कोणाला माहित आहे का काही याच्याबद्दल? अर्थात, मी हा प्रश्न विचारल्यावर बरेच जण गुगल वर शोधतील! हे ही साहजिकच आहे म्हणा. खरं तर हे असले पुरुषदिन साजरे करायची […]
सीट डाऊन – पाऊस आणि ‘ते’ मित्र
पाऊस आणि काही ‘ते’ मित्र यांच्यात मला फार साम्य वाटतं. आधीच सांगून टाकतो मला पाऊस आणि पावसाळा फार आवडत नाही. कवी किंवा लेखकाला पाऊस, ढग आणि पावसाळी वातावरण आवडू नये हा आपल्या (उरल्या सुरल्या) साहित्यिक समाजात फाऊल मानला जातो. काही काही लोक तर कुत्सित प्रश्न करतात “तू कवी आहेस आणि तुला पाऊस आवडत नाही!?” थोडक्यात त्यांना […]