एकदा एक आंधळा माणूस दुपारी एका मित्राकडे भेटायला गेला. गप्पा मारता मारता रात्र झाली, अंधार पडला. आंधळा माणूस घरी जायला निघतो. आंधळा माणूस आणि त्याच्या मित्राच्या घराच्या मध्ये एक जंगल असते. हा माणूस घरी जायला निघणार तेवढ्यात त्याचा मित्र त्याला थांबवतो आणि म्हणतो
“मित्रा अंधार पडलाय थांब जरा”
असं म्हणून एक कागदी कंदील घेऊन येतो आणि मित्राला देतो
“हे घे. हा कंदील घेऊन जा”
आंधळा मित्र हसत म्हणतो
“अरे मी तर काहीच बघू शकत नाही. मग बाहेर अंधार पडला काय आणि न पडला काय? मला कंदील घेऊन काय फरक पडणार आहे?”
मित्र उत्तर देतो
“अरे तुझ्यासाठी नाही पण निदान हा कंदील घेऊन गेलास तर याला बघून कोणी तुला धडकणार तरी नाही ना”
आंधळा माणूस “ठीक आहे” म्हणतो आणि निघून जातो.
घरी जात असताना त्या माणसाला कोणीतरी धडकतो. धक्का लागल्यावर आंधळा माणूस चिडतो आणि म्हणतो
“अरे तुला कंदील दिसत नाही की काय? आंधळा आहेस का?”
तात्पर्य:
आपल्या आयुष्यात अंधार पडला तरीही ज्ञानाच्या प्रकाशाचे आपलेच महत्व आहे. दुसरा जो माणूस धडकला तो ही आंधळा म्हणजे अज्ञानी आहे ज्याला कोणीही कंदील दिला नाही त्यामुळे तो अंधारात एकटाच फिरत आहे.
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा..