काही पत्रे आणि हलकेसे
छायाचित्र
परत पाठवण्याची व्यवस्था
केलीय मी.
आईचे चोरून वाढविलेले केस
नाही पाठवता यायचे
मला.
प्रारंभीच नष्ट झालेल्या एका प्रदीर्घ कवितेचे फक्त
तीन चरण शिल्लक आहेत.
माझ्याजवळ:
काळीज धुक्याने उडते
तू चंद्र जमविले हाती;
वाराही असल्यावेळी
वाहून आणतो माती…
अवकाश थंड हाताशी
दुःखाचा जैसा व्याप;
काळाच्या करुणेमधुनी
सुख गळते आपोआप…
पाण्यावर व्याकुळ जमल्या
झाडांच्या मुद्रित छाया;
मावळत्या मंद उन्हाने
तू आज सजविली काया…
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]