सर्वोत्तम दुकान. चांगले आणि वाईट ही काही अंशी मनाची समजूत देखील आहे. तसेच प्रामाणिक माणसाची सगळ्या गोष्टींकडे बघण्याची, निवडण्याची दृष्टी देखील वेगळी असते. मनाने सर्वोत्तम असणे जास्त महत्त्वाचे आहे. अशा मानसिकतेच्या दुकानदाराचे सर्वोत्तम दुकान पाहून झेन गुरूंना देखील ज्ञान मिळाले! जपानी झेन गुरू बानझान यांच्यासमोर घडलेली ही घटना. घटना तशी साधारण आहे पण, त्यातून मिळणारी शिकवण आणि त्यातील गर्भितार्थ स्तिमीत करणारे आहेत.
एकदा झेन गुरू बानझान, बाजारात फिरत होते तेव्हा एक ग्राहक आणि मटणाचे दुकान चालवणाऱ्या दुकानदाराचे संभाषण बानझान गुरूंच्या कानावर पडले.
ग्राहक म्हणाला, “तुमच्या दुकानातील सर्वोत्तम मांसाचा तुकडा मला द्या!”
“माझ्या दुकानातील सर्व मांस सर्वोत्तमच आहे”, दुकानदार म्हणाला “माझ्या दुकानात तुम्हाला एकही गोष्ट अशी दिसणार नाही जी सर्वोत्तम नाही”
हे ऐकून बानझान गुरूंना, वास्तव आणि अपेक्षा तसेच आयुष्य आणि दैव यांच्याबद्दल एक वेगळाच बोध झाला.
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा!