Olympe de Gouges पूर्वेतिहास “क्रांती” शब्द ऐकलं की सगळ्यांना काहीतरी नवीन, काहीतरी चांगलं करणे हा एकच अर्थ माहित आहे. पण प्रत्येक वेळेस ही क्रांती चांगलंच करेल असे नाही. Olympe de Gouges (ओलांप द गुज) एक असे नाव, एक असा इतिहास, ज्याबद्दल फक्त इतिहासकारच नव्हे तर स्त्रीवादी कार्यकर्ते सुद्धा विसरून गेलेले आहेत. आधुनिक स्त्रीवादाचा पाया रचणारी […]
देशस्थ विरुद्ध कोकणस्थ वाद!?
समजायला लागल्यापासून आपण कोकणस्थ आहोत हे समजले आणि काही दुसरे देशस्थ हे देखील समजले! कोकणात राहणारे ब्राह्मण कोकणस्थ ब्राह्मण आणि देशावर राहणारे ब्राह्मण देशस्थ, खरं सांगायचे तर “देशस्थ – कोकणस्थ” हे प्रकरण इतके साधे, सरळ आणि सोपे प्रकरण आहे. पण, सरळमार्गी गोष्टी सरळच राहू देतील ते ब्राह्मण कसले? आणि त्यातून प्रश्न जर वर्चस्व किंवा श्रेष्ठत्वाचा […]
“फ्रेंच राज्यक्रांती” घडवून आणणाऱ्या क्रांतिकारकांचे मृत्यू – डोळेझाक केलेला इतिहास
इतिहासाचे पुस्तक असो नाहीतर विचारवंतांचा जमाव असो फ्रेंच राज्यक्रांती म्हटलं की वाचणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या अंगात स्फुरण चढतं. अर्थातच फ्रेंच राज्यक्रांती योग्य होती हे सगळेच पटवून द्यायचा प्रयत्न करतात. स्पर्धा परीक्षा साठी अभ्यास करणारे तर बहुदा या राज्यक्रांतीचा अभ्यास करून करून थकून जातात. फ्रेंच राज्यक्रांती चुकीची होती की बरोबर होती याची कारणे अनेकदा या राज्यक्रांतीच्या पूर्वपीठिकेत […]
माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि त्याचे भारतीयांच्या शिक्षणाविषयी एक पत्र
भारतीय समाजसुधारकांच्या अत्यंत लाडक्या इंग्रजांपैकी एक म्हणजे माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन! हा तोच माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन ज्याने मराठ्यांच्या विरोधातील युद्धात इंग्रज फौजेचे नेतृत्व केले होते. आपापल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी एल्फिन्स्टन यांच्या लिखाणाचा आधार घेतात. मानवी इतिहासाचा विचार करता, कोणताही विजयी राजा किंवा विजयी राज्य, पराजिताला आपल्या परीने घडवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येईल. पराजिताचे मनोबल तोडायचे असेल तर आधी […]
झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि धर्म
आज १८ जून, झाशी ची राणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर यांची पुण्यतिथी. परकीयांच्या आक्रमणाला न घाबरता युद्ध करणारी मणिकर्णिका! शस्त्र खाली ठेवलेल्या आप्तांनी परकीयांना मदत केली आणि राणी लक्ष्मीबाई ला आपले राज्य वाचवण्यासाठी हातात शस्त्र घ्यावे लागले. एखाद्या विधवेला हाती शस्त्र घ्यायला विवश करणाऱ्या आप्तांबद्दल फारशी सहानुभूती ठेवण्यात काहीही अर्थ नाही. त्या काळी समाजाचे नियम देखील […]
पेशवे आणि दलित बलुतेदार
महाराष्ट्री समाजात पेशव्यांच्या इतिहासाबद्दल एकंदरीतच अज्ञान आणि गैरसमज खूप आहेत. इतिहासाची पाने उलगडली तर असे लक्षात येते की ज्या त्या काळाची जगण्याची एक व्यवस्था असते, जी त्या कालानुरूप बनलेली असते. कालच्या व्यवस्थेचे आजच्या व्यवस्थेशी तुलनात्मक अध्ययन करणे तसे अवघड असते. तसेच आजची व्यवस्था ५० वर्षांनंतर अत्यंत दूषित ठरवली जाणार नाही कशावरून? असो, मुद्दा इतकाच की […]
मॅडम तुसाद – कलाकार, फ्रेंच राज्यक्रांती आणि रक्तरंजित इतिहास
मॅडम तुसाद – एक प्रसिद्ध अपरिचित कलाकार मॅडम तुसाद (Madame Tussaud) (१ डिसेंबर, १७६१ – १६ एप्रिल, १८५०), एक प्रसिद्ध मूर्तिकार. त्यांचे मूळ नाव “मेरी”. आज त्यांनी स्थापित केलेली मेणाच्या पुतळ्यांची संग्रहालये Madame Tussauds जगभरात प्रसिद्ध आहेत. गरिबीतून मार्ग काढत, नशिबाची साथ मिळत नावारूपास आलेल्या मॅडम तुसाद यांची आयुष्यगाथा खूप रोचक आहे. खरं सांगायचं तर […]
साटं-लोटं म्हणजे काय? – इतिहास आणि व्युत्पत्ति
साटं-लोटं आणि मराठी लहानपणापासून साटं-लोटं हा शब्दप्रयोग कानावर पडत आलेला आहे. माझ्या मते प्रत्येक मराठी माणसाने कधी ना कधी हा “साटं-लोटं करणे” हा वाक्प्रचार उपयोगात आणलेला आहे किंवा ऐकलेला आहे. मी सर्वप्रथम “साटं-लोटं” शब्दप्रयोग ऐकला तो लग्नाच्या बाबतीत. माझ्या नातेवाईकांमध्ये एका कुटुंबात असे झालेले आहे. दोन कुटुंबातील मुलामुलींचे विवाह एकमेकांच्या कुटुंबात होणे म्हणजे साटं-लोटं! थोडक्यात […]
Poom Lim – देवाने तारलेला माणूस!
द्वितीय युद्ध आणि बुडलेले जहाज “देव तारी त्याला कोण मारी ?” किंवा “वह शमा क्या मुझे जिसे रोशन खुदा करे”, हे खरं आहे! आपला काळ सरण्याच्या आधी कोणीही जात नाही आणि आपला काळ झाल्यानंतर कोणीही राहात नाही. आयुष्यात असे कित्येक प्रसंग येतात जेव्हा असं वाटतं की आता आयुष्य उरलेलं नाही. छोट्या छोट्या आजारांनी सुद्धा माणसं […]
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर – एका देवीचा पुनर्जन्म
अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर दिवस फाल्गुन कृष्ण एकादशी, शके १६७५ होळकर घराण्याचे वारस, मल्हारराव होळकर यांचे पुत्र आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पती, खंडेराव होळकर यांचे कुंभेरीच्या किंवा कुम्हेरीच्या किल्ल्याजवळ निधन झाले. होळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मराठ्यांसाठी हा किल्ला ताब्यात घेणं अत्यंत गरजेचं होतं. किल्ला सुरज मल जात यांच्या ताब्यात होता. सुरज […]