छत्रपती शिवाजी महाराजांचा कोडोली गावी मुक्काम छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून स्वराज्यात परत येत होते तेव्हा त्यांनी अनेक ठिकाणी विश्राम केला. अनेक लोकांनी, कुटुंबांनी आणि साधू-संतांनी त्यांची या प्रवासात मदत केली. वेषांतर केल्यामुळे त्यांना कोणीच ओळखू शकत नव्हते. त्याच प्रवासातील हा एक रोचक किस्सा जेव्हा एका गावच्या पाटलीणबाई छत्रपती शिवाजी महाराजांवर भयंकर चिडल्या, त्यांना वाईट साईट बोलल्या. पण, […]
उमाजी नाईक १९३८ – विस्मृतीत गेलेला मराठी सिनेमा
उमाजी नाईक सिनेमा – १९३८ आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांच्याबद्दल थोडी माहिती शोधात असताना एक रोचक माहिती मिळाली. उमाजी नाईक यांच्यावर एक सिनेमा ४ जून १९३८ ला प्रदर्शित झाला होता. आमच्या माहिती नुसार हा सिनेमा आणि त्याची चित्रफीत आता लोकांमध्ये (पब्लिक) उपलब्ध नाही. अधिक माहिती असणाऱ्यांनी आमच्या माहितीत नक्की वृद्धी करावी! गुगल वर फार माहिती नाही मग आम्ही इतर अनेक ठिकाणी […]
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आग्रा ते राजगड – प्रवास, इतिहास आणि किस्से
आग्र्याच्या नजरकैदेतून सुटून शिवाजी महाराज अनेक गावे, राज्ये आणि वने पादाक्रांत करत शेवटी राजगडला पोहोचले. या प्रवासाबद्दल अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलेले आहे. ते सगळे उल्लेख, इतिहास, किस्से आणि छत्रपती ज्या मार्गाने राजगडला पोहोचले तो मार्ग या ब्लॉग मध्ये एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत.

छत्रपती शिवाजी महाराज – काबुल आणि अफवांचे पीक
काबुल ? “छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका” या विषयावर संशोधन करत असताना त्या काळातील पत्रव्यवहारांमध्ये एक फार विचित्र गोष्ट समोर आली. औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराजांना बळजबरीने किंवा एका षड्यंत्रात फसवून “काबुल” ला पाठवणार होता! होय! काबुल ला.. त्या काळच्या दोन पत्रकांमध्ये या गोष्टीचा (अफवेचा!) उल्लेख दिसतो. आम्ही याला “अफवा”च मानतो कारण वास्तव हेच आहे की छत्रपती शिवाजी महाराज कधीही काबुल ला गेल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. आम्हालाही ही […]
“महाबळी अतिबळी” – श्री समर्थ रामदास स्वामी रचित महाबळेश्वर विषयी काव्य
श्री समर्थ रामदास स्वामींचा महाबळेश्वर आणि परिसरावर काही विशेष स्नेह होता हे ऐतिहासिक सत्य आहे. समर्थांनी अनेक वर्षे महाबळेश्वर आणि परिसरात कर्म धर्म आणि राष्ट्रभक्ती यांसाठी कार्य केले. खालील काव्यात समर्थांनी महाबळेश्वर, महाबळेश्वराचा इतिहास व या भागात उपलब्ध फळे, फुले, वनस्पती, कंदमुळे व भाज्या यांचे वर्णन केलेले आहे. समर्थांनी एका अत्यंत वेगळ्या विषयावर हे काव्य रचले. यावरून […]
छत्रपती शिवाजी महाराजांचे मिर्झा राजे जयसिंग यांना पत्र
हे पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी, मिर्झा राजे जयसिंग यांना, पुरंदरच्या तहाच्या आधी लिहिलेले होते. या पत्रातून छत्रपतींचे बुद्धीचातुर्य, दूरदृष्टी, देशभक्ती, धर्मनिष्ठा,राजकारणाची उत्तम जाण, अत्याचारी यवनांबद्दल असलेली चीड आणि स्वदेश-स्वधर्म-स्वकीय यांच्यासाठी लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रखरपणे दिसून येते.
इतिहासकार “जेम्स डग्लस” यांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज
आग्र्याला नजर कैद होण्याआधी एक महत्वाची घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडली ती म्हणजे, दिल्ली दरबारात छत्रपती आणि औरंगजेब यांच्यात झालेली आमने-सामने. आजवर इतिहासाच्या पुस्तकात आपण या भेटींदरम्यान काय झाले? यांचे वर्णन वाचलेले आहे.
हे डावे – उजवे (Left Wing – Right Wing) कुठून आले?
डावे – उजवे कुठून आले? आजकाल राजकारणाचा अभ्यास करणारे, कार्यकर्त्यांना, पक्षांना, विचारवंतांना अगदी सहजपणे डावे – उजवे (Left Wing – Right Wing किंवा Liberals – Conservatives) म्हणतात. पण, फार कमी लोकांना माहित आहे की हे डावे – उजवे कुठून आले? त्यांचा इतिहास काय आहे? या संकल्पनांचा विचारधारणेशी कमी आणि बसण्याच्या जागेशी संबंध आहे हे फारसं कुणाला माहित नसतं! पण, या संकल्पना एका दिवसात […]
.. आणि दिल्लीच्या लालकिल्यावर भगवा फडकला
२२ जुलै १७६० .. श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे दिल्लीत दाखल झाले, तीन दिवसात दिल्ली काबीज झाली आणि काहीच दिवसांनी म्हणजे १ ऑगस्ट १७६० रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पहिल्यांदा भगवा फडकला! पार्श्वभूमी १७५९-६० चा काळ होता. रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा भगवा अटकेपार फडकला होता. मराठ्यांचे साम्राज्य आपल्या शिखरावर होते. दिल्ली, पंजाब, वायव्य सरहद्दचा मुलुख मराठ्यांच्या अधिपत्याखाली […]
आणि मुंबई इंग्रजांना हुंड्यात मिळाली!
मुंबईचा इतिहास अगदी मौर्यकाळापर्यंत जातो. पण अर्वाचीन इतिहासाचा विचार केल्यास मुंबईवर शेवटचे राज्य करणारे इंग्रज, हेच बऱ्याच जणांना माहित आहे. पण ही मुंबई इंग्रजांच्या ताब्यात आली कशी? हे फार लोकांना माहित नाही. जवळजवळ संबंध भारतात इंग्रजांनी राज्य बळकावण्यासाठी बरीच युद्ध केली आणि बऱ्याचदा दोन राज्यांमध्ये युद्ध भडकवली देखील. पण, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मुंबई […]