प्रति मृत्युंजयी तात्याराव सावरकर, तुमचे चरणस्पर्श करून काही शब्द मांडायचा यत्न करतो आहे, जे काल २४ जुलै २०२२ सकाळपासून मनात एखाद्या वावटळासारखे घोंगावत आहेत. ज्या क्षणी मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाने “मृत्युंजयी सावरकर” हे शब्द मंचाच्या पार्श्वभूमीवर मांडलेले पहिले, तेव्हापासून हे मानसिक धैर्य आणि शब्दशक्ती गोळा करायचा प्रयत्न करत आहे. कारण, अथांग आणि अनंत आकाशाच्या व्याप्तीचे […]
बिरुदावल्यांची जलपर्णी
बिरुदावल्यांची जलपर्णी आणि वास्तव भारतासारख्या देशात आणि मुख्यत्वेकरून महाराष्ट्रात नद्या – नाले, तलावांवर माजणारी जलपर्णी नवीन नाही. तशी पाहायला गेलं तर एक वनस्पती, लांबून बघताना हिरवीगार दिसते अगदी एखादी एखाद्या दुलईसारखी. लहानपणी मला वाटायचं, आणि माझी खात्री आहे तुमच्यापैकी काही जणांना देखील कधी ना कधी, ‘जलपर्णी ही एक वनस्पती आहे, भरपूर प्रमाणात दिसत आहे आणि […]
तमसो मां ज्योतिर्गमय
प्रकाशाची भीती फक्त असुराला असते. कारण अंधार हे असुराचं साम्राज्य आहे. पण इतक्या मोठ्या साम्राज्याचं अधिपत्य असूनही असुराच्या मनात एक भीती असते, की त्याचे अंधाराचे साम्राज्य एखाद्या दिव्याने उजळण्यापर्यंतच आहे. एका किरणात देखील त्याचे अंधाराचे साम्राज्य नष्ट क्षमता असते. असुर या किरणांच्या भीतीने ग्रासलेला असतो. त्यामुळे हा असुर सतत या दिव्याशी युद्ध करत असतो, दिव्याला […]
एका विचित्र हसऱ्या मुखवट्यामागचा चेहरा..
अनेक जणांनी (म्हणजे ज्यांनी सोशल मिडिया वर विहार केलेला आहे त्यांनी) एक विचित्र मुखवटा नक्की बघितला असेल. बारीक पण पल्लेदार मिश्या, या कानापासून त्या कानापर्यंत चेहरा व्यापलेलं हास्य आणि तरीही कोणत्याही अंगाने आनंदी न दिसणारा! किंबहुना मनात काहीतरी शिजत आहे, खदखदत आहे याची आशंका निर्माण करणारा हा मुखवटा. हा मुखवटा बंडाचे, अशांततेचे – अस्थिरतेचे एक […]
चिपळूण शहराच्या नावाच्या इतिहास
आम्ही बापट, आमचे मूळगाव कोकणातील चिपळूण पासून जेमतेम ८ मैल अंतरावर आहे. सांगायचा मुद्दा इतकाच की इतिहासातील चित्त्पावनांबद्दल काही संदर्भ शोधत असताना “भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे” एक पत्रक१ वाचनात आले. या पत्रकातील चित्त्पावनांबद्दलच्या इतिहासाबद्दल रा. वि. का राजवाडे यांच्या प्रबंधात या शहराच्या नावाच्या इतिहासाबद्दल माहिती दिलेली आहे. त्या पत्रकाचा संदर्भ खाली देईनच. तर त्या प्रबंधात […]
संभ्रम आणि व्याख्या
त्याला परीघ बनवायची हौस, तिला रेष मारण्याची खोड. शेवटी मी त्यांच्यासाठी अनुभवांचे टिंब काढून दिले आणि म्हणालो आता खेळा! असतात अशा काही प्रश्नकाहूर केविलवाण्या वेळा. त्याने पहिले पाऊल उचलले. पण पाऊल पडण्याआधी तिने सरळ काही टिंबांना छेद दिला. तो स्तिमित झाला पण खचून न जाता काही परीघ बनवू लागला. बघता बघता त्यांच्यात स्पर्धा सुरु झाली. […]
व्यक्तिपूजा आणि भारतीय समाज
कुणाला काय आवडेल? आणि कुणाला कशाचा तिटकारा वाटेल? सांगता येत नाही. कधी कधी तत्त्वांच्या आहारी (!) गेल्याने परिप्रेक्ष्य धूसर होऊन जातो. तसंच काहीसं मनाला वाटून गेलं जेव्हा काही मंडळींनी नरेंद्र मोदींच्या पुतळ्याला श्रद्धेने नमस्कार केला आणि काहींनी (जवळजवळ सगळ्यांनी) मनापासून या गोष्टीचा तिरस्कार केला.
भारतीयांना रांगेची ॲलर्जी का आहे?
नाटक – सिनेमा बघायला गेल्यावर ज्या एका गोष्टीचा मला मनापासून उबग येतो ती गोष्ट म्हणजे सामोसा – वडा विकणाऱ्याच्या समोरील माणसांच्या थप्पीतून वाट काढत काहीतरी विकत घेणे. मला ते दृष्य एखाद्या युद्धासारखे वाटते. पण हा अनुभव फक्त सिनेमाघरात किंवा नाट्यगृहापर्यंत मर्यादित नाही. मला कधी PMT बसमध्ये, मुंबईच्या लोकलमध्ये घुसता आलं नाही, बँकेत मी काऊंटर समोर […]
शहाण्यांसाठी इसापनीती – सिंह प्रेमात पडतो!
ही आणखी एक इसापनीतीची कथा ज्यात सिंह प्रेमात पडतो आणि प्रेमाच्या आवेगात, भावनेच्या भरात स्वतःचे नुकसान करून घेतो. या कथेचे तात्पर्य देखील हेच सांगितले जाते की “माणूस प्रेमात पडला किंवा भावनिक झाला की चुकीचे निर्णय घेतो”. पण हा उपदेश ज्यांना हे आधीच माहित आहे की “भावनेच्या भारत निर्णय घेतले की नुकसान होतं” त्यांना सांगून काय […]
शहाण्यांसाठी इसापनीती – वारा आणि सूर्य
इसापनिती मधील ही आणखी एक लोकप्रिय कथा “वारा आणि सूर्य”. तर कथा अशी आहे की एकदा वारा आणि सूर्य यांचे “अधिक ताकदवान कोण?” यावरून भांडण होते. दोघांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार होत नाही. त्यांचे भांडण चालू होते तोच एक माणूस अंगावर शाल पांघरून तिथून चालला होता. सूर्य वाऱ्याला म्हणाला, “तो बघ एक माणूस शाल पांघरून […]