मित्रांनो ससा आणि कासवाची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. त्यावर नाना तऱ्हेची गाणी, बडबडगीते लिहिली आणि गेली गेलेली आहेत. लहान मुलांना देखील हे ठाऊक असते की शर्यत कोण जिंकला ससा की कासव? हे ही सगळ्यांना ठाऊक आहे की ससा गाफील राहिला म्हणून त्याला शर्यत जिंकता अली नाही. कासव त्याच्या “कूर्मगतीने” न थांबता चालत राहिला. […]
वेडात मराठे वीर दौडले सात (संपूर्ण कविता) ~ कुसुमाग्रज
टापांचा आवाज, पंडितजींचे संगीत, लता दिदींचे स्वर, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे शब्द आणि शूरवीरांच्या आठवणीने चढलेले स्फुरण. “वेडात मराठे वीर दौडले सात” हे शब्द कानी पडताच अंगावर रोमांच उभे राहतात. मराठ्यांचे असीम शौर्य, हिंदवी स्वराज्यासाठी केलेले बलिदान, देव देश आणि धर्मासाठी उचलेले खड्ग सगळं काही डोळ्यांसमोर उभं राहतं. मराठी साम्राज्याचा गौरवशाली धगधगता इतिहास. आणखी एक माहिती […]
स्त्रियांना मताधिकार देणारा जगातील पहिला देश..
स्त्रियांना मताधिकार आजच्या जगात स्त्रियांना मताधिकार असणे, त्यांनी मतदानात सक्रिय सहभाग घेणे इतकंच काय तर उमेदवार म्हणून उभे राहणे हे देखील एकदम सामान्य आहे. कोणालाच यात काहीच विशेष वाटत नाही. पण १९ व्या शतकापर्यंत स्त्रियांना मताधिकार नव्हता हे किती जणांना माहित आहे? ज्या ज्या पाश्चात्य देशांना आपण “प्रगत” समजतो त्या देशांमध्येही स्त्रियांना मतदानाचा अधिकार अगदी आत्ता […]
छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पाटलीणबाईंनी केलेली टीका शांतपणे ऐकून घेतली!
छत्रपती शिवाजी महाराजांचा कोडोली गावी मुक्काम छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून स्वराज्यात परत येत होते तेव्हा त्यांनी अनेक ठिकाणी विश्राम केला. अनेक लोकांनी, कुटुंबांनी आणि साधू-संतांनी त्यांची या प्रवासात मदत केली. वेषांतर केल्यामुळे त्यांना कोणीच ओळखू शकत नव्हते. त्याच प्रवासातील हा एक रोचक किस्सा जेव्हा एका गावच्या पाटलीणबाई छत्रपती शिवाजी महाराजांवर भयंकर चिडल्या, त्यांना वाईट साईट बोलल्या. पण, […]
प्रवाह, परिस्थिती आणि नियती.. एक चिंतन
प्रवाहच थांबतो तिथे, जिथे तू उभी असतेस… प्रत्येक वळणावर भेटतेस, कधी साथ देतेस कधी उगाच हात सोडून हरवतेस.वाट असते पण मार्ग दिसत नाही. नशीब म्हणत म्हणत पुढे जाताना पुन्हा प्रत्येक मार्गावर तू दिसतेस…. मी थांबतेच पण पुन्हा पुन्हा तूला प्रश्न विचारावसा वाटतो, साथ देणार की हात सोडणार…?? सहज उत्तरतेस तू पुढे तर चाल, मी आहेच […]
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस आणि आपली जबाबदारी
लोकशाहीमध्ये फक्त लोकच सत्तेत आणू शकतात आणि तेच सत्तेतून बाहेर काढू शकतात. एवढी शक्ती जर लोकांच्या हातात असेल तर जबाबदारी देखील तेवढ्याच प्रमाणात वाढते.
उमाजी नाईक १९३८ – विस्मृतीत गेलेला मराठी सिनेमा
उमाजी नाईक सिनेमा – १९३८ आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांच्याबद्दल थोडी माहिती शोधात असताना एक रोचक माहिती मिळाली. उमाजी नाईक यांच्यावर एक सिनेमा ४ जून १९३८ ला प्रदर्शित झाला होता. आमच्या माहिती नुसार हा सिनेमा आणि त्याची चित्रफीत आता लोकांमध्ये (पब्लिक) उपलब्ध नाही. अधिक माहिती असणाऱ्यांनी आमच्या माहितीत नक्की वृद्धी करावी! गुगल वर फार माहिती नाही मग आम्ही इतर अनेक ठिकाणी […]
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आग्रा ते राजगड – प्रवास, इतिहास आणि किस्से
आग्र्याच्या नजरकैदेतून सुटून शिवाजी महाराज अनेक गावे, राज्ये आणि वने पादाक्रांत करत शेवटी राजगडला पोहोचले. या प्रवासाबद्दल अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलेले आहे. ते सगळे उल्लेख, इतिहास, किस्से आणि छत्रपती ज्या मार्गाने राजगडला पोहोचले तो मार्ग या ब्लॉग मध्ये एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत.
(दुसऱ्याच्या) अंगणातील फुले, मंदिर आणि प्रार्थना
सकाळी सकाळी फिरण्याचे शारीरिक आरोग्याला फायदे होतात (होऊदे बापुडे!) पण मी फिरतो ते मानसिक आणि वैचारिक आरोग्य चांगले राहावे म्हणून. काही छोट्या घटना पाहून एक विचार मनात येतो. मग तो विचार स्वतःबरोबर अनेक विचारांना ‘मागुते या’ करत घेऊन येतो. चकरा मारता मारता या उप-विचारांचा एक विचित्र गुंता बनतो आणि मग एक खेळ सुरू होतो. खेळ, या गुंत्यातून तर्काच्या धाग्याला अलगदपणे बाहेर काढण्याचा! असंच काहीसं घडलं आज […]

छत्रपती शिवाजी महाराज – काबुल आणि अफवांचे पीक
काबुल ? “छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका” या विषयावर संशोधन करत असताना त्या काळातील पत्रव्यवहारांमध्ये एक फार विचित्र गोष्ट समोर आली. औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराजांना बळजबरीने किंवा एका षड्यंत्रात फसवून “काबुल” ला पाठवणार होता! होय! काबुल ला.. त्या काळच्या दोन पत्रकांमध्ये या गोष्टीचा (अफवेचा!) उल्लेख दिसतो. आम्ही याला “अफवा”च मानतो कारण वास्तव हेच आहे की छत्रपती शिवाजी महाराज कधीही काबुल ला गेल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. आम्हालाही ही […]