एकदा एका माणसाच्या मागे एक वाघ लागला. माणूस जीवाला वाचवण्यासाठी जंगलातून पळत सुटला. वाघ पाठलाग करत होता. पळता पळता माणूस एका खोल दरीच्या इथे पोहोचला. वाघ पाठलाग करतच होता. शेवटी तो माणूस त्या दरीमध्ये जाणाऱ्या एका वेलीला धरून दरीमध्ये उतरला. त्याला वाटलं की सुटलो. तो वाघ त्या दरीच्या वर उभा होता. माणूस त्या दरीमध्ये, एका […]
नमन स्वातंत्र्यवीरा
काही लोकांना सूर्याचं अस्तित्व मान्य नाही म्हणून मी त्याचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे, हा त्या सूर्याचा अपमान आहे. सूर्य स्वयंसिद्ध आहे!
झेन कथा मराठीत – खरंच का !? (Really !?)
झेन गुरू हाकुईन हे एक अत्यंत साधे, सरळ व स्वच्छ चारित्र्याचे म्हणून सर्वदूर प्रसिद्ध होते. त्यांच्या घराच्या शेजारी एका भाजीवाल्याचे घर होते. भाजीवाल्याला एक सुंदर तरुण मुलगी होती. एके दिवशी अचानक भाजीवाला आणि त्याच्या बायकोला समजतं की त्यांची मुलगी गरोदर आहे! भाजीवाला आणि त्याची बायको अत्यंत रागावतात आणि तिला गर्भातील मुलाचा बाप कोण आहे विचारतात. […]
झेन कथा मराठीत – भरलेला पेला (Empty Cup)
एकोणिसाव्या शतकात जपानमध्ये नान’इन नावाचे एक झेन गुरू होते. त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. त्यांची ख्याती ऐकून एका युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर नान’इन यांना भेटायला येतात. प्रोफेसर पाश्चात्य शिक्षण घेतलेले होते. प्रोफेसर, नान’इन यांना भेटायला त्यांच्या घरी येतात. झेन गुरू त्यांचे यथोचित स्वागत करतात आणि त्यांच्या येण्याचे प्रयोजन विचारतात. “आम्ही तुमच्याकडून झेनबद्दल माहिती घ्यायला. झेनबद्दल शिकायला आलेलो […]
झेन कथा मराठीत – मी संन्यासी का झालो (Why I became a monk?)
वृद्ध झेन गुरू शांत स्वरात म्हणाले,
“कधी वेळ मिळालाच.. तर मी संन्यासी का झालो ही कथा तुम्हाला सांगेन”
झेन कथा मराठीत – कदाचित (Maybe)
“तू खूप नशीबवान आहेस..” इचिरोच्या खांद्यावर हात ठेवून शेजारी पटकन बोलला
आणि पुन्हा एकदा इचिरो शांतपणे उत्तरतो.. “कदाचित!”
झेन कथा मराठीत – ओझं (The Burden)
पुढील महिना दोन महिने तो सतत याच विचारात होता की ‘गुरूंनी असं का केलं? धर्म का मोडला?’. त्याला झोप लागत नव्हती, सतत याच प्रश्नाने तो वेढलेला असे.
इंद्र जिमि जम्भ पर
महाकवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवार्थी अनेक वीररसयुक्त काव्ये रचली. त्यातील “इंद्र जिमि जम्भ पर” हे काव्य मराठी चित्रपटांमुळे आणि गाण्यांमुळे अधिक प्रकाशात आले. महाकवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवार्थी रचलेल्या “इंद्र जिमि जंभ पर” या काव्याचा मराठी रसास्वाद इन्द्र जिमि जंभ पर , बाडब सुअंभ पर ।रावन सदंभ पर , […]
तीन चरण (राजपुत्र आणि डार्लिंग) – कवी ग्रेस
काही पत्रे आणि हलकेसेछायाचित्रपरत पाठवण्याची व्यवस्थाकेलीय मी.आईचे चोरून वाढविलेले केसनाही पाठवता यायचेमला.प्रारंभीच नष्ट झालेल्या एका प्रदीर्घ कवितेचे फक्ततीन चरण शिल्लक आहेत.माझ्याजवळ: काळीज धुक्याने उडतेतू चंद्र जमविले हाती;वाराही असल्यावेळीवाहून आणतो माती…अवकाश थंड हाताशीदुःखाचा जैसा व्याप;काळाच्या करुणेमधुनीसुख गळते आपोआप…पाण्यावर व्याकुळ जमल्याझाडांच्या मुद्रित छाया;मावळत्या मंद उन्हानेतू आज सजविली काया…

म्हणूनच आणि इथेही तिथेही
एकटेपणा आणि एकान्त यात निश्चित फरक आहे. एकटेपणा ही एक मानसिक अवस्था आहे पण एकांत ही परिस्थितीतून निर्माण झालेली वास्तविकता आहे. पण या दोन गोष्टींचा जेव्हा संगम होतो तेव्हा लक्षात येतं की लिहिणारे ही आपणंच बोलणारे ही आपणंच करणारे ही आपणंच .. स्वतःला सावरणारे ही आपणंच कारण या संगमावर मानसिक अवस्था आणि वास्तविकता या दोन […]