समईच्या शुभ्र कळ्या – (संपूर्ण कविता) समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते केसातच फुललेली जाई पायांशी पडते. भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे. साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची. गाठीमध्ये गं जिवाच्या तुझी अंगार्याची बोटे वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये […]
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज (भावार्थ)
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी अगदी सोप्या आणि थेट शब्दांत मनाची अवस्था, त्यानुरूप भासणारे जग आणि वस्तुस्थिती, याचे विवेचन केलेले आहे.
“महाबळी अतिबळी” – श्री समर्थ रामदास स्वामी रचित महाबळेश्वर विषयी काव्य
श्री समर्थ रामदास स्वामींचा महाबळेश्वर आणि परिसरावर काही विशेष स्नेह होता हे ऐतिहासिक सत्य आहे. समर्थांनी अनेक वर्षे महाबळेश्वर आणि परिसरात कर्म धर्म आणि राष्ट्रभक्ती यांसाठी कार्य केले. खालील काव्यात समर्थांनी महाबळेश्वर, महाबळेश्वराचा इतिहास व या भागात उपलब्ध फळे, फुले, वनस्पती, कंदमुळे व भाज्या यांचे वर्णन केलेले आहे. समर्थांनी एका अत्यंत वेगळ्या विषयावर हे काव्य रचले. यावरून […]
Image by Basil Smith from Pixabay
केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली – सुरेश भट । एक नवे रसग्रहण
केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली.. सुरेश भटांची एक अप्रतिम आणि अत्यंत नाजूक गझल. या गझलेचे मला झालेले आकलन आणि रसग्रहण तुमच्यासमोर मांडत आहे.
अबीर गुलाल उधळीत रंग – भावार्थ
अबीर गुलाल उधळीत रंग।नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग॥ धृ ॥ उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातिहीन|रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन|पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग॥ १ ॥ वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू।चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ।विठ्ठलाचे नाम घेऊ होउनी निःसंग ॥ २॥ आषाढी-कार्तिकी भक्तजन येती।पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती।चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग॥ ३॥ […]
अवघा रंग एक झाला, रंगि रंगला श्रीरंग- भावार्थ
अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥१॥मी तूंपण गेले वायां ।पाहतां पंढरीचा राया ॥२॥नाही भेदाचें तें काम ।पळोनि गेले क्रोध काम ॥३॥देही असोनि विदेही ।सदा समाधिस्त पाही ॥४॥पाहते पाहणें गेले दूरी ।म्हणे चोखियाची महारी ॥५॥ कोणताही रसिक मराठी माणूस जेव्हा “अवघा रंग एक झाला” हे शब्द स्मरतो किंवा वाचतो तेव्हा चटकन मनात घुमतो तो म्हणजे स्वर्गिय किशोरीताई आमोणकर यांचे स्वर. लहानपणापासून या अभंगाची […]
जोगिया
कोन्यात झोपली सतार, सरला रंगपसरली पैंजणे सैल टाकुनी अंग,दुमडला गालिचा, तक्के झुकले खालीतबकात राहिले देठ, लवंगा, साली झूंबरी निळ्या दीपांत ताठली वीजका तुला कंचनी, अजुनी नाही नीज?थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठीते डावलुनी तू दार दडपिले पाठी. हळुवार नखलिशी पुन: मुलायम पान,निरखिसी कुसर वर कलती करुनी मानगुणगुणसि काय ते?- गौर नितळ तव कंठी –स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी. […]
नमन स्वातंत्र्यवीरा
काही लोकांना सूर्याचं अस्तित्व मान्य नाही म्हणून मी त्याचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे, हा त्या सूर्याचा अपमान आहे. सूर्य स्वयंसिद्ध आहे!
इंद्र जिमि जम्भ पर
महाकवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवार्थी अनेक वीररसयुक्त काव्ये रचली. त्यातील “इंद्र जिमि जम्भ पर” हे काव्य मराठी चित्रपटांमुळे आणि गाण्यांमुळे अधिक प्रकाशात आले. महाकवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवार्थी रचलेल्या “इंद्र जिमि जंभ पर” या काव्याचा मराठी रसास्वाद इन्द्र जिमि जंभ पर , बाडब सुअंभ पर ।रावन सदंभ पर , […]
तीन चरण (राजपुत्र आणि डार्लिंग) – कवी ग्रेस
काही पत्रे आणि हलकेसेछायाचित्रपरत पाठवण्याची व्यवस्थाकेलीय मी.आईचे चोरून वाढविलेले केसनाही पाठवता यायचेमला.प्रारंभीच नष्ट झालेल्या एका प्रदीर्घ कवितेचे फक्ततीन चरण शिल्लक आहेत.माझ्याजवळ: काळीज धुक्याने उडतेतू चंद्र जमविले हाती;वाराही असल्यावेळीवाहून आणतो माती…अवकाश थंड हाताशीदुःखाचा जैसा व्याप;काळाच्या करुणेमधुनीसुख गळते आपोआप…पाण्यावर व्याकुळ जमल्याझाडांच्या मुद्रित छाया;मावळत्या मंद उन्हानेतू आज सजविली काया…