ही कथा आहे खरं प्रेम आणि वरवर असणारे आकर्षण यांच्याबद्दल..
एका झेन मठात जवळजवळ २० पुरुष अनुयायी आणि एक एशून नावाची महिला अनुयायी, एका मोठ्या गुरूंच्याकडे झेन पंथाची आराधना करत होते, ध्यान करत होते.
एशून एक सुंदर स्त्री होती, तरुण होती आणि डोक्यावरचे केस मुंडन करून आणि अगदी साधे कपडे परिधान करूनही ती आकर्षक दिसत होती. अनेक अनुयायी चोरून तिच्यावर प्रेम करू लागले. त्यांच्यातील एकाने एशूनला प्रेमपत्र लिहिले होते, ज्यात चोरून एका खाजगी भेटीबद्दल विचारले होते.
एशूनने त्या दिवशी पात्राला उत्तर दिले नाही. दुसऱ्या दिवशी त्यांच्या मठातील गुरूंचे प्रवचन झाल्यावर एशून उठली आणि जमलेल्या अनुयायांपुढे जाऊन उभी राहली आणि पत्र लिहिणाऱ्या अनुयायाला उद्देशून बोलली,
“जर तू खरोखरच माझ्यावर इतकं प्रेम करतोस तर आत्ता उठून मला मिठीत घे”
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा..