डावे – उजवे कुठून आले? आजकाल राजकारणाचा अभ्यास करणारे, कार्यकर्त्यांना, पक्षांना, विचारवंतांना अगदी सहजपणे डावे – उजवे (Left Wing – Right Wing किंवा Liberals – Conservatives) म्हणतात. पण, फार कमी लोकांना माहित आहे की हे डावे – उजवे कुठून आले? त्यांचा इतिहास काय आहे? या संकल्पनांचा विचारधारणेशी कमी आणि बसण्याच्या जागेशी संबंध आहे हे फारसं कुणाला माहित नसतं! पण, या संकल्पना एका दिवसात […]
Image by PublicDomainPictures from Pixabay
झेन कथा मराठीत – योग्य प्रमाण (Right Proportion)
जपानमध्ये सेन नोरी क्यु नावाचे चहा बनवण्यात निष्णात गुरू होते. ते त्यांच्या चहातील पदार्थांचे आणि प्रक्रियेचे प्रमाण यांच्यासाठी प्रसिद्ध होते. या गुरूंची ही, आयुष्यात योग्य प्रमाणाचे महत्त्व सांगणारी गोष्ट. एकदा सेन नोरी क्यु गुरूंना आपल्या घराच्या एका खांबावर फुलाच्या परडीसाठी एक खिळा ठोकायचा असल्याने, त्यांनी एका सुताराला बोलावले. सुतार आला आणि त्याने खिळा नक्की कुठे […]
झेन कथा मराठीत – निसरडी वाट (Sleepery Stone)
ज्ञानाची वाट निसरडी असते, प्रत्येक पाऊल जपून ठेवले पाहिजे. साकीतो नावाचे एक झेन गुरू होते. लोक त्यांना Stonehead म्हणत. याला कारण त्यांचे केस नसलेले डोके आणि त्यांची खडकावर बसून एखाद्या स्थिर खडकाप्रमाणे ध्यानसाधनेची सवय. एकदा एका झेन अनुयायाने, अजून एक गुरू मा त्सु यांच्याकडे, गुरू साकीतो यांना आव्हान द्यायची ईच्छा व्यक्त केली. मा त्सु शांतपणे […]
Monastery , Image by Suket Dedhia from Pixabay
झेन कथा मराठीत – आभार!? (Do You Want Me To Thank you!?
आभार कुणी कुणाचे मागायचे?.. पूर्वी उमेझा नावाचा एक धनाढ्य व्यापारी होता. त्याला दानधर्म करायचा नाद होता. त्याच्या गावात एक शियेत्सु नावाच्या झेन गुरूंचा मठ होता. उमेझाच्या मनात आले की आपण या शियेत्सु गुरूंना काही पैसे दान करू, म्हणजे ते अजून मोठा मठ बंधू शकतील. असा,विचार करून उमेझा, सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या मोठ्या थैल्या घेऊन शियेत्सु गुरूंच्या […]
झेन कथा मराठीत – भिकाऱ्याचे झेन (Story of Tosui A Beggar’s Zen)
तोसुई नावाचे एक खूप प्रतिष्टीत आणि मोठे झेन धर्मगुरू होते. त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. तोसुई वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आणि मठांमध्ये जाऊन प्रवचन द्यायचे. झेन ची प्रवचने देता देता त्यांची ख्याती इतकी वाढली की त्यांच्या अनुयायांची संख्या खूप जास्त वाढली. जिथे जिथे तोसुई जायचे तिथे तिथे त्यांचे अनुयायी जायचे. हळूहळू तोसुई गुरूंना याचा उबग आला आणि […]
झेन कथा मराठीत – एशून चा मृत्यू (Eshun’s Death)
स्त्री झेन संन्यासी एशून साधारण ६० वर्षांच्या होत्या जेव्हा त्यांना जाणीव झाली की हा दिवस त्यांचा शेवटचा दिवस आहे, मृत्यू समिप आलेला आहे! त्यांनी आजूबाजूच्या झेन अनुयायांना सारणासाठी लाकडे गोळा करायला सांगितली. अनुयायी थोडे विचारात पडले पण नंतर त्यांनी लाकडे गोळा केली. हळुहळू चिता बनते. एशून त्या सरणावर जाऊन मध्यभागी बसतात आणि चिंता पेटवायला सांगतात. […]
Image by Basil Smith from Pixabay
केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली – सुरेश भट । एक नवे रसग्रहण
केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली.. सुरेश भटांची एक अप्रतिम आणि अत्यंत नाजूक गझल. या गझलेचे मला झालेले आकलन आणि रसग्रहण तुमच्यासमोर मांडत आहे.
.. आणि दिल्लीच्या लालकिल्यावर भगवा फडकला
२२ जुलै १७६० .. श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे दिल्लीत दाखल झाले, तीन दिवसात दिल्ली काबीज झाली आणि काहीच दिवसांनी म्हणजे १ ऑगस्ट १७६० रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पहिल्यांदा भगवा फडकला! पार्श्वभूमी १७५९-६० चा काळ होता. रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा भगवा अटकेपार फडकला होता. मराठ्यांचे साम्राज्य आपल्या शिखरावर होते. दिल्ली, पंजाब, वायव्य सरहद्दचा मुलुख मराठ्यांच्या अधिपत्याखाली […]
झेन कथा मराठीत – बायकोचे भूत आणि दाणे (Zen story of Wife’s Ghost and Beans)
ही एक फार जूनी कथा आहे, एका माणसाला त्याच्या बायकोचे भूत दिसत असे. तर झालं असं की.. एक तरुण बायको आजारामुळे मरणासन्न झालेली होती. तिचे तिच्या नवऱ्यावर अतोनात प्रेम असते. जेव्हा तिला जाणीव होते की, मरण जवळ येऊन ठेपलेली असते तेव्हा ती नवऱ्याला सांगते, “माझे तुमच्यावर अतोनात प्रेम आहे. मला तुम्हाला सोडून जायचं नाहीये आणि तुम्ही देखील माझ्यापासून […]
अबीर गुलाल उधळीत रंग – भावार्थ
अबीर गुलाल उधळीत रंग।नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग॥ धृ ॥ उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातिहीन|रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन|पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग॥ १ ॥ वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू।चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ।विठ्ठलाचे नाम घेऊ होउनी निःसंग ॥ २॥ आषाढी-कार्तिकी भक्तजन येती।पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती।चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग॥ ३॥ […]