एकोणिसाव्या शतकात जपानमध्ये नान’इन नावाचे एक झेन गुरू होते. त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. त्यांची ख्याती ऐकून एका युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर नान’इन यांना भेटायला येतात. प्रोफेसर पाश्चात्य शिक्षण घेतलेले होते. प्रोफेसर, नान’इन यांना भेटायला त्यांच्या घरी येतात. झेन गुरू त्यांचे यथोचित स्वागत करतात आणि त्यांच्या येण्याचे प्रयोजन विचारतात. “आम्ही तुमच्याकडून झेनबद्दल माहिती घ्यायला. झेनबद्दल शिकायला आलेलो […]
झेन कथा मराठीत – मी संन्यासी का झालो (Why I became a monk?)
वृद्ध झेन गुरू शांत स्वरात म्हणाले,
“कधी वेळ मिळालाच.. तर मी संन्यासी का झालो ही कथा तुम्हाला सांगेन”
झेन कथा मराठीत – कदाचित (Maybe)
“तू खूप नशीबवान आहेस..” इचिरोच्या खांद्यावर हात ठेवून शेजारी पटकन बोलला
आणि पुन्हा एकदा इचिरो शांतपणे उत्तरतो.. “कदाचित!”
झेन कथा मराठीत – ओझं (The Burden)
पुढील महिना दोन महिने तो सतत याच विचारात होता की ‘गुरूंनी असं का केलं? धर्म का मोडला?’. त्याला झोप लागत नव्हती, सतत याच प्रश्नाने तो वेढलेला असे.
पुरुषदिन – एक जागतिक उदासदिन
तर आज जागतिक पुरुषदिन! काहीही लिहायच्या आधी हे सांगणं आलंच की मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीयेत. कारण स्वतः उदास झालेला माणूस कोणाच्या भावना कसा दुखवू शकतो !? कोणाला माहित आहे का काही याच्याबद्दल? अर्थात, मी हा प्रश्न विचारल्यावर बरेच जण गुगल वर शोधतील! हे ही साहजिकच आहे म्हणा. खरं तर हे असले पुरुषदिन साजरे करायची […]
इंद्र जिमि जम्भ पर
महाकवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवार्थी अनेक वीररसयुक्त काव्ये रचली. त्यातील “इंद्र जिमि जम्भ पर” हे काव्य मराठी चित्रपटांमुळे आणि गाण्यांमुळे अधिक प्रकाशात आले. महाकवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवार्थी रचलेल्या “इंद्र जिमि जंभ पर” या काव्याचा मराठी रसास्वाद इन्द्र जिमि जंभ पर , बाडब सुअंभ पर ।रावन सदंभ पर , […]
तीन चरण (राजपुत्र आणि डार्लिंग) – कवी ग्रेस
काही पत्रे आणि हलकेसेछायाचित्रपरत पाठवण्याची व्यवस्थाकेलीय मी.आईचे चोरून वाढविलेले केसनाही पाठवता यायचेमला.प्रारंभीच नष्ट झालेल्या एका प्रदीर्घ कवितेचे फक्ततीन चरण शिल्लक आहेत.माझ्याजवळ: काळीज धुक्याने उडतेतू चंद्र जमविले हाती;वाराही असल्यावेळीवाहून आणतो माती…अवकाश थंड हाताशीदुःखाचा जैसा व्याप;काळाच्या करुणेमधुनीसुख गळते आपोआप…पाण्यावर व्याकुळ जमल्याझाडांच्या मुद्रित छाया;मावळत्या मंद उन्हानेतू आज सजविली काया…
सीट डाऊन – पाऊस आणि ‘ते’ मित्र
पाऊस आणि काही ‘ते’ मित्र यांच्यात मला फार साम्य वाटतं. आधीच सांगून टाकतो मला पाऊस आणि पावसाळा फार आवडत नाही. कवी किंवा लेखकाला पाऊस, ढग आणि पावसाळी वातावरण आवडू नये हा आपल्या (उरल्या सुरल्या) साहित्यिक समाजात फाऊल मानला जातो. काही काही लोक तर कुत्सित प्रश्न करतात “तू कवी आहेस आणि तुला पाऊस आवडत नाही!?” थोडक्यात त्यांना […]
कलाकाराचा मृत्यु
मला विचाराल तर नोकरदार मध्यमवर्ग स्वतःच्या घरात जन्माला आलेली कला आणि कलाकार यांच्यासाठी एक चिरंतन थडगे आहे. कलाकाराचा खून करून त्यावर आनंदाने भयाची चादर चढवली जाते आणि वर व्यावहारिक परिपक्वतेचे उपदेश एखाद्या नशेप्रमाणे एकदुसऱ्यांना दिले जातात. या थडग्यावर उभे राहून ही अहमामिका सुरू असते आणि कलाकार वास्तविकतेच्या ढिगाऱ्याखाली थडग्यात हुंदके देत असतो आणि विचारत असतो […]

म्हणूनच आणि इथेही तिथेही
एकटेपणा आणि एकान्त यात निश्चित फरक आहे. एकटेपणा ही एक मानसिक अवस्था आहे पण एकांत ही परिस्थितीतून निर्माण झालेली वास्तविकता आहे. पण या दोन गोष्टींचा जेव्हा संगम होतो तेव्हा लक्षात येतं की लिहिणारे ही आपणंच बोलणारे ही आपणंच करणारे ही आपणंच .. स्वतःला सावरणारे ही आपणंच कारण या संगमावर मानसिक अवस्था आणि वास्तविकता या दोन […]