क्वचितच कोणी मराठी माणूस असेल ज्याला “आभाळमाया” शीर्षक गीत माहित नाही. मंगेश कुळकर्णी यांचे अत्यंत हळुवार पण गभीर शब्द, अशोक पत्की यांचे मनाला भावणारे संगीत आणि सांजेच्या किरणांसारखे वाहून येणारे देवकी पंडित यांचे स्वर. हे गाणं ऐकताना एका वेगळ्याच विश्वास पाऊल ठेवल्यासारखं वाटतं. पण, गाण्यात या कवितेची सगळी कडवी घेतलेली नाहीत. या काव्याचे रसग्रहण मी […]
तुमच्याकडे खरंच वेळ आहे का? एक लघु कथा
अनेकांच्या आयुष्यात घडतात तशा अनपेक्षित, दुःखदायी घटना माझ्याही आयुष्यात घडलेल्या आहेत. आज ज्या माणसाशी बोललो तो अचानक हे जग सोडून गेल्याचं कळतं. मग अशा वेळी आपल्याला ‘काळ’ मुळातच समजलेला नाही याची प्रचिती येते. मनात विचार येतो “खरंच कुणाला आपल्याकडे किती वेळ आहे हे माहित असतं का?” काळापुढे आपलं काहीच चालत नाही.. आणि हा विचार सुरु […]
चेहरा बोलतो.. फक्त ऐकता आलं पाहिजे
आज २९ ऑगस्ट, इन्ग्रिड बर्गमन यांचा जन्मदिन आणि स्मृतिदिन सुद्धा. इन्ग्रिड बर्गमन मला आधीपासून माहित होतीच पण तिचा आणि माझा, माझ्या माहितीपेक्षा अधिक जवळचा संबंध आहे हे नंतर समजलं. माणिक गोडघाटे नावाच्या कवीने स्वतःसाठी “ग्रेस” हे टोपणनाव का निवडले? याबद्दल मला कायम कुतुहल वाटायचे. त्याचे उत्तर ग्रेसने एका मुलाखतीत दिले. की इन्ग्रिड बर्गमन यांचे वर्णन […]
विंचू चावला – संत एकनाथ महाराजांची मूळ रचना आणि त्याचा भावार्थ
विंचू चावला -पार्श्वभूमी खरं सांगायचं तर सर्वसामान्य मराठी माणसाला संत एकनाथ महाराज आणि त्यांची भारुडे हा अपरिचित विषय नाही. त्यातून “विंचू चावला” हे भारूड तर न माहित असणं अत्यंत विरळाच. पण हा माझा समज दुर्दैवाने दूर झाला, जेव्हा एका तरुणीने सांगितले की तिला हे माहीतच नव्हते की “विंचू चावला” हे एक अध्यात्मिक काव्य आहे. आणि […]
“रथचक्र उद्धरू दे” : कृष्ण कर्ण संवाद (मोरोपंतांची आर्या)
मराठी साहित्य आणि वाङ्मयीन इतिहासाबद्दल आदर असणाऱ्या सर्व रसिकांना मोरोपंत माहित नाही असं होणं अशक्य आहे. पूर्वी शालेय शिक्षणातील काव्याभ्यासाचे अबकड, मोरोपंतांच्या आर्या, वामन पंडितांची काव्ये इत्यादी असत. मोरोपंतांच्या आर्या हे मराठी साहित्यातील एक अजरामर आणि अवीट गोडीचे संग्रह आहेत. हल्ली या आर्या पुस्तकातून गायब झाल्या आहेत (केल्या गेल्या आहेत !?). तरीही आपल्या येणाऱ्या पिढ्यांना […]
आदी शंकराचार्य आणि माया
पूर्वी कर्नाटकातील होयसळ राज्याचा विष्णू वर्धन नावाचा एक राजा होता. विष्णू वर्धन वैष्णव पंथ पाळत असे. त्याचा आदी शंकराचार्यांच्या “माया” सिद्धांताला विरोध होता. अवघे विश्व एक माया आहे असं आदी शंकराचार्यांचं म्हणणं होतं. याचा एक अर्थ असाही होतो की राजाकडे जी काही संपत्ती, राज्य वगैरे आहे ती सगळी माया आहे. कोणत्या राजाला हे ऐकायला आवडेल. […]
शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य
एकदा आदी शंकराचार्य आपल्या शिष्यांबरोबर चालत होते. शंकराचार्यांच्या मनात आपल्या शिष्यांच्या विचारांची आणि सत्त्वाची परीक्षा घ्यायचे आले. ते चालले होते त्या रस्त्याच्या कडेला एक ताडीचे दुकान होते. शंकराचार्य काहीही पूर्वसूचना न देता त्या ताडीच्या दुकानात शिरले. त्यांचे शिष्य देखील त्यांच्या मागे दुकानात गेले. शंकराचार्यांनी एक भांडे भरून ताडी प्यायली. त्यांच्या शिष्यांनी सुद्धा एकेक भांडे ताडी […]
गार्गी आणि ब्रह्मज्ञानी
ही कथा आहे महान योगिनी, तत्त्वज्ञानी आणि ऋषिका “गार्गी” ची. गार्गी कायम ज्ञानसंचयात व्यस्त असे. शिकण्याची आणि समजून घेण्याची अत्यंत आवड होती आणि गती देखील होती. तिची किर्ती सर्वदूर पसरलेली होती. एकदा कोणी एक ब्रह्मज्ञानी, एका दूरच्या दुर्गम वनात निवास करत असल्याचे तिला समजले. ज्ञान मिळवण्याच्या आणि त्या ब्रह्मज्ञानींचे दर्शन घेण्याच्या हेतूने ती, त्या वनाच्या […]
संभ्रम आणि व्याख्या
त्याला परीघ बनवायची हौस, तिला रेष मारण्याची खोड. शेवटी मी त्यांच्यासाठी अनुभवांचे टिंब काढून दिले आणि म्हणालो आता खेळा! असतात अशा काही प्रश्नकाहूर केविलवाण्या वेळा. त्याने पहिले पाऊल उचलले. पण पाऊल पडण्याआधी तिने सरळ काही टिंबांना छेद दिला. तो स्तिमित झाला पण खचून न जाता काही परीघ बनवू लागला. बघता बघता त्यांच्यात स्पर्धा सुरु झाली. […]
व्यक्तिपूजा आणि भारतीय समाज
कुणाला काय आवडेल? आणि कुणाला कशाचा तिटकारा वाटेल? सांगता येत नाही. कधी कधी तत्त्वांच्या आहारी (!) गेल्याने परिप्रेक्ष्य धूसर होऊन जातो. तसंच काहीसं मनाला वाटून गेलं जेव्हा काही मंडळींनी नरेंद्र मोदींच्या पुतळ्याला श्रद्धेने नमस्कार केला आणि काहींनी (जवळजवळ सगळ्यांनी) मनापासून या गोष्टीचा तिरस्कार केला.