शिवाजी महाराजांची महती सांगणे हे म्हणजे सूर्य तेजपुंज आहे हे सांगण्यासारखं आहे. आपण या आनंदवनभुवन राजाच्या भूमीत जन्म घेतला हेच मोठे पुण्य आहे. इतिहासाचा अभ्यास करताना वेळोवेळी शिवाजी महाराजांची पत्रे समोर येतात. अशा पत्रांना ऐतिहासिक विषयांच्या अभ्यासाच्या साधनांत अनन्यसाधारण महत्व आहे, अनेकदा बखरींपेक्षा अधिक. कारण, बखरी इतर कोणीतरी लिहिलेल्या असतात, त्याच्यात लिहिणाऱ्याची सापेक्ष बुद्धी डोकावण्याची […]
कांचन आणि आपट्याचे पान ।
दसरा आला की मला आपट्याच्या पानांपेक्षा जास्त आठवण येते ती कांचनाच्या पानांची! कवी ग्रेस यांचे एक वाक्य आहे, “रामाच्या वनवासाची खरी भागीदारीण झाली उर्मिला”. कांचनाच्या पानांची मला थोडी फार तशीच गत वाटते. वर्षानुवर्षे लोक आपट्याची पाने म्हणून कांचनाची पाने ओरबाडत आहेत, बाजारात विकत आहेत आणि विकत घेणारे विकत घेत आहेत. एखाद्याने अभागी असावे तरी किती? […]
“सुंदरजी प्रभु” – विस्मृतीत गेलेले शिवरायांचे गुप्तहेर
शिवरायांचे गुप्तहेर खाते किती जबरदस्त होते हे त्यांनी केलेल्या यशस्वी मोहिमा, परिणामकारक हल्ले आणि रणनीतीमधील शिताफीवरुन उघड आहेच. पण त्यांच्या गुप्तहेरखात्याबद्दल फार कुणाला काही अवगत नाही हे ही त्या खात्याचे एक यशच आहे हे आपण विश्वासराव नानाजी प्रभु दिघे मुसेखोरेकर यांच्यावरील ब्लॉगवरून सिद्ध होतेच. पण तरीही जो काही ऐतिहासिक मजकूर, पत्रे इत्यादी साहित्य उपलब्ध आहे […]
हेटकरी – महान मराठी योद्धे (Hetkari – Ferocious Maratha Warriors)
हेटकरी आणि मावळे “शिवकाल” म्हटलं की एक शब्द आपोआप मनात उमटतो तो म्हणजे मावळे! मराठ्यांचे सैन्य म्हटले की मावळे असे जणू एक समीकरणच झालेले आहे. खरं तर मावळ प्रांतात जे राहतात ते मावळे या हिशोबाने शिवाजी महाराजांच्या सैन्यात बहुतेक सगळे सैनिक आणि योद्धे मावळातीलच होते असं म्हणावं लागेल. पण, वस्तुस्थिती तशी नाही. इतिहासाची पाने ओलांडताना, […]
विश्वासराव नानाजी प्रभु दिघे देशपांडे मुसेखोरेकर – शिवरायांचे (अपरिचित) गुप्तहेर
कोणत्याही साम्रज्याच्या गुप्तहेर खात्याबद्दल विशेष माहिती न मिळणे हे खरं तर त्या गुप्तहेर खात्याचे यशच आहे. आपल्या शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याबद्दल देखील असंच आहे. शिवरायांच्या गुप्तहेरांबद्दल फारशी माहिती कुठे मिळत नाही. फक्त काहीच ठिकाणी त्यांचा थोडा फार उल्लेख केलेला आहे. त्यावरूनच समजतं की शिवरायांचे गुप्तहेर खाते किती कर्तव्यदक्ष होते. शिवकालीन गुप्तहेर म्हटलं की पहिलं नाव […]
आभाळमाया.. आभाळमाया (गाण्यात नसलेल्या कडव्यासह संपूर्ण कविता)
क्वचितच कोणी मराठी माणूस असेल ज्याला “आभाळमाया” शीर्षक गीत माहित नाही. मंगेश कुळकर्णी यांचे अत्यंत हळुवार पण गभीर शब्द, अशोक पत्की यांचे मनाला भावणारे संगीत आणि सांजेच्या किरणांसारखे वाहून येणारे देवकी पंडित यांचे स्वर. हे गाणं ऐकताना एका वेगळ्याच विश्वास पाऊल ठेवल्यासारखं वाटतं. पण, गाण्यात या कवितेची सगळी कडवी घेतलेली नाहीत. या काव्याचे रसग्रहण मी […]
“चौधरी” शब्दाची रोचक व्युत्पत्ति
शब्द आणि त्यांचा इतिहास, हा एक अत्यंत रोचक आणि मनोरंजक छंद आहे. या छंदाची जोपासणी करताना कधी काय सापडेल याचा काही नेम नाही? यातच भारत इतिहास संशोधक मंडळातील काही कागदपत्रे वाचत असताना “चौधरी” या शब्दाच्या व्युत्पत्तिबद्दल माहिती समोर आली. वि. का. राजवाडे यांच्या एका लघुलेखात ही माहिती दिलेली आहे. अजूनही काही स्रोतांच्या मार्फत ही माहिती […]
आफ्रिकन चित्ता आणि सायबेरियन वाघ
आफ्रिकन चित्ता आणि भारतीय वाघ भारतात खरं तर पट्टेरी वाघ आणि बिबटे हेच जंगली मार्जार मानले जातात. पण पूर्वी भारतात चित्ते देखील होते हे कधीकधी आठवत नाही. गेले काही दिवस आफ्रिकेतून भारतात आणलेल्या चित्त्यांबद्दल भरपूर चर्चा सुरु आहे. माझ्या मते हे एक चांगले पाऊल आहे. माणसाच्या रक्तपिपासू छंदापायी हा उमदा प्राणी भारतातून विलुप्त झाला. भारतात […]
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस आणि भारताचा दैदिप्यमान इतिहास
आजची लोकशाही.. थोडी पार्श्वभूमी आज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस आलेला आहे. अनेक माध्यमांद्वारे लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. बघावं तिकडे लोकशाहीचा उदो उदो सुरु आहे. मी मात्र एका विचाराने त्रस्त आहे. तो मी मांडेनच. पण त्याच्या आधी थोडी पार्श्वभूमी स्पष्ट करणं गरजेचं आहे. सांप्रत काळात लोकशाहीला राज्यव्यवस्थेचा सर्वोत्तम मार्ग असे घोषित केलेले आहे. माझ्याही […]
तुमच्याकडे खरंच वेळ आहे का? एक लघु कथा
अनेकांच्या आयुष्यात घडतात तशा अनपेक्षित, दुःखदायी घटना माझ्याही आयुष्यात घडलेल्या आहेत. आज ज्या माणसाशी बोललो तो अचानक हे जग सोडून गेल्याचं कळतं. मग अशा वेळी आपल्याला ‘काळ’ मुळातच समजलेला नाही याची प्रचिती येते. मनात विचार येतो “खरंच कुणाला आपल्याकडे किती वेळ आहे हे माहित असतं का?” काळापुढे आपलं काहीच चालत नाही.. आणि हा विचार सुरु […]