चित्र हजार शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असते हे मी नवीन सांगण्याची गरज नाही. पण कधी कधी एखादा प्रसंग, मनाच्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये असा काही बसतो की विचारांची ढवळाढवळ सुरु होते. काही दिवसांपूर्वी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. फिरत फिरत जंगली महाराज रस्त्यावर आलो. बालगंधर्व जवळील फुटपाथवर चालण्याची इच्छा झाली. त्यातल्या त्यात बरा भाग आहे चालण्यासाठी. आधीच काही फोटो, […]
चेहरा बोलतो.. फक्त ऐकता आलं पाहिजे
आज २९ ऑगस्ट, इन्ग्रिड बर्गमन यांचा जन्मदिन आणि स्मृतिदिन सुद्धा. इन्ग्रिड बर्गमन मला आधीपासून माहित होतीच पण तिचा आणि माझा, माझ्या माहितीपेक्षा अधिक जवळचा संबंध आहे हे नंतर समजलं. माणिक गोडघाटे नावाच्या कवीने स्वतःसाठी “ग्रेस” हे टोपणनाव का निवडले? याबद्दल मला कायम कुतुहल वाटायचे. त्याचे उत्तर ग्रेसने एका मुलाखतीत दिले. की इन्ग्रिड बर्गमन यांचे वर्णन […]
विंचू चावला – संत एकनाथ महाराजांची मूळ रचना आणि त्याचा भावार्थ
विंचू चावला -पार्श्वभूमी खरं सांगायचं तर सर्वसामान्य मराठी माणसाला संत एकनाथ महाराज आणि त्यांची भारुडे हा अपरिचित विषय नाही. त्यातून “विंचू चावला” हे भारूड तर न माहित असणं अत्यंत विरळाच. पण हा माझा समज दुर्दैवाने दूर झाला, जेव्हा एका तरुणीने सांगितले की तिला हे माहीतच नव्हते की “विंचू चावला” हे एक अध्यात्मिक काव्य आहे. आणि […]
फेरफटका – आजचा काल (Pune Street Photography)
पहाटे उठल्या उठल्या आधी खिडकीतून बाहेर बघितलं, कुठेही ढग दिसत नव्हते! ताबडतोब आवरून बाहेर पडलो. कुठे ते बाहेर पडेपर्यंत निश्चित माहित नव्हतं. बाहेर पडताना प्रभात रोडच्या दिशेने जायचं मनात होतं पण बिल्डिंगबाहेर पाय पडताच, ते सरळ अलका टॉकीज चौकाकडे चालू लागले. आणि मनातल्या मनात एक Google Map तयार झाला. अलका चौक, डेक्कन, जंगली महाराज रस्ता […]
एलिझाबेथ बॅथरी: स्त्री ड्रॅक्युला (Elizabeth Bathory: The Female Dracula)
इतिहासाची पाने उलटताना कधीकधी अचानक धक्कादायक, अजब घटना आणि व्यक्ती समोर येतात. माणूस विचारात पडतो की असं कसं घडलं!? एलिझाबेथ बॅथरी चा (Elizabeth Bathory) जन्म, युरोपमधील हंगेरी मध्ये राजकीयदृष्ट्या एका प्रभावशाली कुटुंबात ७ ऑगस्ट १५६० साली झाला. तिचे काका पोलंड चे राजे आणि पुतण्या ट्रान्सिल्व्हानिया चा राजपुत्र. तिचा पती फेरेंक नाडासडी (Ferenc Nádasdy) हा सुद्धा […]
साधू आणि गवळीण (Story of a Sadhu and a Milkmaid)
तर गोष्ट अशी की, बऱ्याच वर्षांपूर्वी एका नदीच्या किनारी एक साधू राहत होते. त्यांच्याकडे रोज सकाळी एक निरक्षर आणि साधी भोळी गवळीण दूध देण्यासाठी येत असे. पण तिच्या येण्याची वेळ निश्चित नसायची. याचे कारण म्हणजे तिचे घर नदीच्या पलीकडे होते. त्यामुळे तिला येण्याजाण्यासाठी नावाड्यांवर अवलंबून राहणे भाग होते. जोपर्यंत नावाडी आणि नाव उपलब्ध होणार नाही […]
“रथचक्र उद्धरू दे” : कृष्ण कर्ण संवाद (मोरोपंतांची आर्या)
मराठी साहित्य आणि वाङ्मयीन इतिहासाबद्दल आदर असणाऱ्या सर्व रसिकांना मोरोपंत माहित नाही असं होणं अशक्य आहे. पूर्वी शालेय शिक्षणातील काव्याभ्यासाचे अबकड, मोरोपंतांच्या आर्या, वामन पंडितांची काव्ये इत्यादी असत. मोरोपंतांच्या आर्या हे मराठी साहित्यातील एक अजरामर आणि अवीट गोडीचे संग्रह आहेत. हल्ली या आर्या पुस्तकातून गायब झाल्या आहेत (केल्या गेल्या आहेत !?). तरीही आपल्या येणाऱ्या पिढ्यांना […]
दीप अमावस्या – एका कवीचे मनोगत (Deep Amavasya)
मला कायमच अंधार, दिवा आणि प्रकाश या त्रिवेणीने स्तंभित केलेले आहे. दीप अमावस्या किंवा दिव्याची अवस म्हणजे तर या त्रिवेणीच्या अस्तित्त्वाचा उत्सवच! मग माझ्यातला कवी कसा काय स्वस्थ बसू शकतो? देवाच्या कृपेने मी अजून तरी स्वतःला “अंधार वाईट” या भ्रमापासून दूर ठेवू शकलेलो आहे. याचे कारण असे आहे की, अंधार नसला तर प्रकाशाचे काय महत्त्व […]
मृत्युंजयी सावरकर
प्रति मृत्युंजयी तात्याराव सावरकर, तुमचे चरणस्पर्श करून काही शब्द मांडायचा यत्न करतो आहे, जे काल २४ जुलै २०२२ सकाळपासून मनात एखाद्या वावटळासारखे घोंगावत आहेत. ज्या क्षणी मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाने “मृत्युंजयी सावरकर” हे शब्द मंचाच्या पार्श्वभूमीवर मांडलेले पहिले, तेव्हापासून हे मानसिक धैर्य आणि शब्दशक्ती गोळा करायचा प्रयत्न करत आहे. कारण, अथांग आणि अनंत आकाशाच्या व्याप्तीचे […]
बिरुदावल्यांची जलपर्णी
बिरुदावल्यांची जलपर्णी आणि वास्तव भारतासारख्या देशात आणि मुख्यत्वेकरून महाराष्ट्रात नद्या – नाले, तलावांवर माजणारी जलपर्णी नवीन नाही. तशी पाहायला गेलं तर एक वनस्पती, लांबून बघताना हिरवीगार दिसते अगदी एखादी एखाद्या दुलईसारखी. लहानपणी मला वाटायचं, आणि माझी खात्री आहे तुमच्यापैकी काही जणांना देखील कधी ना कधी, ‘जलपर्णी ही एक वनस्पती आहे, भरपूर प्रमाणात दिसत आहे आणि […]