तर गोष्ट अशी की, बऱ्याच वर्षांपूर्वी एका नदीच्या किनारी एक साधू राहत होते. त्यांच्याकडे रोज सकाळी एक निरक्षर आणि साधी भोळी गवळीण दूध देण्यासाठी येत असे. पण तिच्या येण्याची वेळ निश्चित नसायची. याचे कारण म्हणजे तिचे घर नदीच्या पलीकडे होते. त्यामुळे तिला येण्याजाण्यासाठी नावाड्यांवर अवलंबून राहणे भाग होते. जोपर्यंत नावाडी आणि नाव उपलब्ध होणार नाही […]
“रथचक्र उद्धरू दे” : कृष्ण कर्ण संवाद (मोरोपंतांची आर्या)
मराठी साहित्य आणि वाङ्मयीन इतिहासाबद्दल आदर असणाऱ्या सर्व रसिकांना मोरोपंत माहित नाही असं होणं अशक्य आहे. पूर्वी शालेय शिक्षणातील काव्याभ्यासाचे अबकड, मोरोपंतांच्या आर्या, वामन पंडितांची काव्ये इत्यादी असत. मोरोपंतांच्या आर्या हे मराठी साहित्यातील एक अजरामर आणि अवीट गोडीचे संग्रह आहेत. हल्ली या आर्या पुस्तकातून गायब झाल्या आहेत (केल्या गेल्या आहेत !?). तरीही आपल्या येणाऱ्या पिढ्यांना […]
दीप अमावस्या – एका कवीचे मनोगत (Deep Amavasya)
मला कायमच अंधार, दिवा आणि प्रकाश या त्रिवेणीने स्तंभित केलेले आहे. दीप अमावस्या किंवा दिव्याची अवस म्हणजे तर या त्रिवेणीच्या अस्तित्त्वाचा उत्सवच! मग माझ्यातला कवी कसा काय स्वस्थ बसू शकतो? देवाच्या कृपेने मी अजून तरी स्वतःला “अंधार वाईट” या भ्रमापासून दूर ठेवू शकलेलो आहे. याचे कारण असे आहे की, अंधार नसला तर प्रकाशाचे काय महत्त्व […]
मृत्युंजयी सावरकर
प्रति मृत्युंजयी तात्याराव सावरकर, तुमचे चरणस्पर्श करून काही शब्द मांडायचा यत्न करतो आहे, जे काल २४ जुलै २०२२ सकाळपासून मनात एखाद्या वावटळासारखे घोंगावत आहेत. ज्या क्षणी मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाने “मृत्युंजयी सावरकर” हे शब्द मंचाच्या पार्श्वभूमीवर मांडलेले पहिले, तेव्हापासून हे मानसिक धैर्य आणि शब्दशक्ती गोळा करायचा प्रयत्न करत आहे. कारण, अथांग आणि अनंत आकाशाच्या व्याप्तीचे […]
बिरुदावल्यांची जलपर्णी
बिरुदावल्यांची जलपर्णी आणि वास्तव भारतासारख्या देशात आणि मुख्यत्वेकरून महाराष्ट्रात नद्या – नाले, तलावांवर माजणारी जलपर्णी नवीन नाही. तशी पाहायला गेलं तर एक वनस्पती, लांबून बघताना हिरवीगार दिसते अगदी एखादी एखाद्या दुलईसारखी. लहानपणी मला वाटायचं, आणि माझी खात्री आहे तुमच्यापैकी काही जणांना देखील कधी ना कधी, ‘जलपर्णी ही एक वनस्पती आहे, भरपूर प्रमाणात दिसत आहे आणि […]
तमसो मां ज्योतिर्गमय
प्रकाशाची भीती फक्त असुराला असते. कारण अंधार हे असुराचं साम्राज्य आहे. पण इतक्या मोठ्या साम्राज्याचं अधिपत्य असूनही असुराच्या मनात एक भीती असते, की त्याचे अंधाराचे साम्राज्य एखाद्या दिव्याने उजळण्यापर्यंतच आहे. एका किरणात देखील त्याचे अंधाराचे साम्राज्य नष्ट क्षमता असते. असुर या किरणांच्या भीतीने ग्रासलेला असतो. त्यामुळे हा असुर सतत या दिव्याशी युद्ध करत असतो, दिव्याला […]
आदी शंकराचार्य आणि माया
पूर्वी कर्नाटकातील होयसळ राज्याचा विष्णू वर्धन नावाचा एक राजा होता. विष्णू वर्धन वैष्णव पंथ पाळत असे. त्याचा आदी शंकराचार्यांच्या “माया” सिद्धांताला विरोध होता. अवघे विश्व एक माया आहे असं आदी शंकराचार्यांचं म्हणणं होतं. याचा एक अर्थ असाही होतो की राजाकडे जी काही संपत्ती, राज्य वगैरे आहे ती सगळी माया आहे. कोणत्या राजाला हे ऐकायला आवडेल. […]
एका विचित्र हसऱ्या मुखवट्यामागचा चेहरा..
अनेक जणांनी (म्हणजे ज्यांनी सोशल मिडिया वर विहार केलेला आहे त्यांनी) एक विचित्र मुखवटा नक्की बघितला असेल. बारीक पण पल्लेदार मिश्या, या कानापासून त्या कानापर्यंत चेहरा व्यापलेलं हास्य आणि तरीही कोणत्याही अंगाने आनंदी न दिसणारा! किंबहुना मनात काहीतरी शिजत आहे, खदखदत आहे याची आशंका निर्माण करणारा हा मुखवटा. हा मुखवटा बंडाचे, अशांततेचे – अस्थिरतेचे एक […]
शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य
एकदा आदी शंकराचार्य आपल्या शिष्यांबरोबर चालत होते. शंकराचार्यांच्या मनात आपल्या शिष्यांच्या विचारांची आणि सत्त्वाची परीक्षा घ्यायचे आले. ते चालले होते त्या रस्त्याच्या कडेला एक ताडीचे दुकान होते. शंकराचार्य काहीही पूर्वसूचना न देता त्या ताडीच्या दुकानात शिरले. त्यांचे शिष्य देखील त्यांच्या मागे दुकानात गेले. शंकराचार्यांनी एक भांडे भरून ताडी प्यायली. त्यांच्या शिष्यांनी सुद्धा एकेक भांडे ताडी […]
गार्गी आणि ब्रह्मज्ञानी
ही कथा आहे महान योगिनी, तत्त्वज्ञानी आणि ऋषिका “गार्गी” ची. गार्गी कायम ज्ञानसंचयात व्यस्त असे. शिकण्याची आणि समजून घेण्याची अत्यंत आवड होती आणि गती देखील होती. तिची किर्ती सर्वदूर पसरलेली होती. एकदा कोणी एक ब्रह्मज्ञानी, एका दूरच्या दुर्गम वनात निवास करत असल्याचे तिला समजले. ज्ञान मिळवण्याच्या आणि त्या ब्रह्मज्ञानींचे दर्शन घेण्याच्या हेतूने ती, त्या वनाच्या […]